https://essay-online.com/

Image

भूमित्र शेतकऱ्यांचा मित्र

नमस्कार मंडळी,

सन २०१८ मध्ये स्थापन झालेल्या आपल्या कंपनीने कामाच्या पहिला वर्षातच आपल्या उत्पादनावर भारत सरकार द्वारे सुरु असलेल्या “स्टार्ट-अप इंडिया” प्रकल्पात विदर्भातून प्रथम तर महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकविला आहे . शेतकरी कुटुंबाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेला हा व्यवसाय; अत्याधुनिक पद्धतीने नवीन उत्पादने व तत्रंज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे. “भूमित्र” हे फक्त नाव नसून आमचं ध्येय आणि स्वप्न आहे. शेतकऱ्यांची कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढवावी या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत. त्या उद्देशाने माती/पाणी परीक्षणच्या सेवा देखील भूमित्र पुरवीत आहे. या मोहिमेचा भाग होण्यासाठी धन्यवाद, आपले “भूमित्र” परिवारात स्वागत आहे.

Image

जैविक शेती आणि शेतकरी

2१व्या शतकाच्या सुरुवातीस वेगाने बदलणाऱ्या शेती पद्धतींवर सेंद्रिय शेती ही परिणाम घडवून अन्नारारी शेती प्रणाली आहे. विविध सेंद्रिय शेती संघटनांनी सेंद्रीय शेती विकसित केली आहे. ही सेंद्रीय शेती मूळ उर्वरके जसे कंपोस्ट खत, हिरवं खत आणि हाडांच्या चुऱ्यावर अवलंबून असते. जैविक कीटक नियंत्रण, मिश्रित पीक आणि कीटकनाशकांचा संसर्ग यांसारख्या गोष्टींना या शेतीत प्रोत्साहन आणि प्राधान्य दिलं जाते.

भूमित्र आपणास एक मदतीचा हात आहे, आपल्या शेतीत योग्य ती उपज घ्यायला. बी-बियाण्यांच्या योग्य सल्ल्यापासून शेतीत पिकाच्या वाढीसाठी लागणाऱ्या प्रत्येक मदतीपर्यंत भूमित्र प्रयोगशाळा अनेक शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करत आली आहे. आपणही एक संधी द्यावी.